पल्लवी अधिकारी झाली. वडील रंगकाम करतात .आई शिवणकाम तरीही UPSC सारख्या परीक्षेत पल्लवीने यश मिळवलं .आपल्या स्वप्नांपुढे परिस्थितीही झुकते ,हे तिने सिद्ध केले आहे. स्पर्धा परीक्षेतून अनेकजण घडतात पण हि स्पर्धा म्हणजे एक प्रकारची रिस्क असते. पल्लवीने पण १ लाखाची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी झाली. अमरावतीच्या बिच्छू टेकडीजवळील विटाभट्टी परिसरातील पल्लवी चिंचखेडेची ही यशोगाथा.
सामान्यतः अजूनही मुलींना चांगलं शिक्षण देण्यामागे कारण,तिला चांगलं सासर मिळावं ,जोडीदार आर्थिकदृष्ट्या चांगला असावा म्हणून दिले जाते. पण पल्लवीच्या आईवडिलांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षण दिले.त्यासोबत तिच्या स्वप्नांना बळ पण दिले. पल्लविचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनतर आईवडिलांच्या अपेक्षेनुसार शिक्षण पूर्ण करीत नोकरी मिळवली.पल्लवीला एका मोठ्या कंपनीत एक लाख रुपये वेतनाची नोकरी मिळाली. लहान बहीण बँकेत रूजू झाली. खरतर एका कुटुंबासाठी आणि शिकलेल्या मुलींसाठी हि आनंदाची गोष्ट होती . आता पुन्हा कष्ट करण्याची गरज नव्हती.पण, मनात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. पल्लवीने अभ्यासाला सुरुवात केली. दिल्लीला जावून तयारी करावी लागणार असल्याने लाख रुपयाची नोकरी सोडून दिली.
आई शिवणकाम करून संसार चालवत असताना पल्लवीने आपल्या स्वप्नांचे धागे जिद्दीने विणले. आणि वडिलांच्या रंगकाम करणाऱ्या हातामध्ये आपल्या यशाचा रंग उतरवला.समाजातील प्रत्येक मुलीसाठी आणि आईवडिलांसाठी आदर्श ठरेल अशीच हि कहाणी आहे.पल्लवी यूपीएससी उत्तीर्ण झाल्याची वार्ता मंगळवारी समजताच अमरावतीकरांनी तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केले.अमरावती शहरातील बिच्चू टेकडू इथल्या पल्लवी देविदास चिंचखेडे या तरूणीनं केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिनं हे यश संपादन केलं. पाच वर्षांचे तिचे परिश्रम फळाला आले आणि तिला युपीएससीच्या २०२१ च्या 'सिव्हिल सर्व्हिसेस मेन' या परीक्षेत यश मिळाले. राखीव यादीतील निकाल जाहीर झाले. त्यात तिला ६३ वे स्थान मिळाले आहे.
पल्लवी नक्कीच अनेक मुलींसाठी ज्या स्वतःच अस्तित्व निर्माण करू इच्छितात त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली आहे.