थेट येऊन कोविड लसीचा डोस घेऊन जा; मुंबईत आज फक्त महिलांचं लसीकरण

Update: 2021-09-27 03:12 GMT

लसीकरणात महिलांचा टक्का कमी असल्याचे लक्षात येताच मुंबई महानगरपालिका गेली काही दिवस महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवत आहे. तर आज मुंबई पालिकेनं (BMC) फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण (Women Vaccination) सत्र राबवलं आहे. कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर, सोमवार ( 27 सप्टेंबर 2021) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

मुंबई महापालिकेनं यापूर्वी सुद्धा महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. विशेष म्हणजे त्याला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता पुन्हा महिलांठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तर या विशेष लसीकरण सत्रात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येईल. मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन महिलांना कोविड लस घेता येईल.

Tags:    

Similar News