तीने सहज जीन्स वर काढली डिझाईन आणि मिळाले दहा लाख लाइक्स

निकी मॅकमुलेन या तरुणीने केलेल्या कलाकृतीचा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या या कलाकृतीला बघता बघता दहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.;

Update: 2022-04-05 03:09 GMT

आपल्या इथल्या प्रत्येकामध्ये टॅलेंट कुठून भरलेलं आहे असं तुम्ही नेहमी आपल्या अनेक आसपासच्या लोकांकडून ऐकत असाल. अनेकदा याचा प्रत्यय देखील तुम्हाला आला असेल. आपल्या भन्नाट कल्पना वापरून अनेक जणांनी आपलं करियर केल्याचं देखील तुम्ही पहिलं असेल. कोण काय करेल आणि त्याला त्यामध्ये कधी यश येईल हे सांगता येत नाही. आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे. या सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही तुमच्या कला, तुमचे कौशल्य अगदी सहजरित्या जगापुढे मांडू शकता. आणि तुमच्या कौशल्याना एक चांगला व्यासपीठ मिळवून देऊ शकता. याच सोशल मीडियाने अनेकांना जगण्याचे एक नवे व्यासपीठ मिळवून दिलं आहे तर अनेकांचे आयुष्य देखील बरबाद केले आहे.

अनेक लोक म्हणतात की, सोशलमीडियाच्या नादाला लागून तरुण पिढी वाया गेली आहे. पण ही तरुण पिढी खरच वाया गेली आहे का? तस पाहिलं तर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्याच्या माध्यमातून तरुणांनी या समाजमाध्यमांचा वापर करतं आपले करियर घडवलं आहे. अनेक उगवत्या कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. पण दुसरी बाजू देखील तितकीच सत्य आहे. याचं समाजमाध्यमांवर अनेकांनी अत्यंत घृणास्पद अशा गोष्टी केल्या आणि ते आज तुरुंगात देखील आहेत. सोशल मीडियाला बंधन नाही. आता ते कश्या पद्धतीने वापरायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं..

आपण नेहमी म्हणतो ना, चांगल्या गोष्टी नेहमी आत्मसात कराव्यात आणि वाईट गोष्टींना तिलांजली द्यावी. तर सोशल मीडिया वापरताना याचं भान सर्वांना असले पाहिजे.

आज मात्र आम्ही एक खास गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. एका तरुणीने तिच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देत समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आणि त्यानंतर समाज माध्यमांनी तिला अक्षरश: डोक्यावर घेतलं. तुम्ही म्हणाल असं नक्की काय केलं?

तर थोडा धीर धरा आपण हेच पाहणार आहोत. तर या तरुणीच्या डोक्यामध्ये एक बिझनेस आयडिया आली. अनेकांच्या डोक्यामध्ये आशा कल्पनाही येतं असतात मात्र अशी कल्पना आल्यानंतर काय करावं? आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट सर्व लोकांपुढे कसं घेऊन जावं? असं सर्वांना वाटत असतं. असं जर तुम्हाला देखील वाटत असेल तर तुम्ही या तरुणीने केलेली गोष्ट नक्की बघा.

या तरुणीने तिला आवड असलेली गोष्ट केली. तिने तिच्या एका जीन्स पॅन्टवरती एक डिझाईन केली आणि केलेल्या त्या कलाकृतीचा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या या कलाकृतीला बघता बघता दहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.

या तरुणीने काय केलं तर तिला लहान पणापासून असलेली आवड जोपासत तिच्या एका पॅन्ट वरती एक सुंदर नक्षी बनवली. आणि त्यानंतर हे आपलं कौशल्य आपल्या पुरते मर्यादित न राहता इतरांना देखील पाहता यावं यासाठी समाजमाध्यमांवर शेअर केलं. आणि त्यानंतर तिच्या या कलाकृतीला लोकांनी अफलातून असा प्रतिसाद देखील दिला. या तरुणीचं नाव आहे निकी मॅकमुलेन.

तिने केलेल्या पोस्टमध्ये ती काय म्हणते ते देखील आपण एकदा पाहुयात, "मी एम्ब्रॉयडरी मध्ये माझ्या कौशल्याना आजमावण्याचा निर्णय घेतला. माझ्या नावडत्या जीन्सवर याचा सराव केला व जे काही वाईट होईल ते होउदे असं म्हणत ते मी ते पूर्ण केले. पण मला आता असं वाटते की माझ्याकडे एक नवीन माझी आवडती जीन्स आहे" असं म्हणत तिने जिन्सवर जी एम्ब्रॉयडरी केली त्याचीच आज सर्वत्र चर्चा आहे.या तरुणीची ही कल्पना आहे ना भन्नाट.

तर तुम्ही देखील हे वाचून फक्त शांत बसू नका. तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या डोक्यात देखील आशा काहीतरी खास कल्पना आहेत तर त्या तुम्ही समाज माध्यमांवर जरी शेअर करणार नसाल तरी त्या आमच्या सोबत शेअर करू शकता. तुमच्या कशा कलागुणांना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू..

Tags:    

Similar News