नवनीत राणांच्या लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी राणा दांपत्याला सुनावलं

Update: 2022-05-10 11:42 GMT

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघा उभयतांमुळे राज्याचं राजकारण गेल्या महिन्याभरापासून अस्थिर आहे. या दोघांनाही अटक झाली त्यानंतर १४ दिवसंनी दोघेही जामीनावर बाहेर आले. पुन्हा माध्यमांसमोर वक्तव्य करू लागले. पण आता या दांपत्याने स्वतःच्या मुलांनाही या राजकारणात खेचलं आहे. राणा दांपत्याच्या मुलीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या आई बाबांना हनुमान चालिसा वाचल्यामुळे त्यांना अटक केली आणि त्यांना आम्हाला भेटताच आलं नाही त्यामुळे मी आता त्यांन दिल्लीला भेटायला चाललोय असं बोलताना दिसतेय.

या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी आता राणा दांपत्याला धारेवर धरलंय अनेकांनी लहान मुलांना राजकारणात का खेचताय असं म्हणत राणा दांपत्याला आता थांबायला सांगत आहेत. साम टीव्हीच्या वरीष्ठ पत्रकार रश्मी पुराणीक यांनी राणा दांपत्यावर टीका करताना म्हटलंय, "सगळ्यात वाईट गोष्ट

ज्या मुलांना राजकारण किंवा धर्म माहित नाही नसताना त्यांच्या मनात हे भरवले जाणे..आणि कॅमेरा समोर बोलायला लावणे किती योग्य आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही फेल आहात पण पालक म्हणून पण अतिशय बेजबाबदार आहात.. #थांबाआता"

तर राहूल गडपाले यांनी हा व्हिडीओ ट्विटरला पोस्ट करत राणा दांपत्यावर टीका केली आहे. "अरे किमान या चिमुकल्यांना तरी सोडा…यांचा राजकारणासाठी वापर करताना हे विसरायला नको की आपण पुढल्या पिढ्यांना काय शिक्षण देतोय…असंच होणार का महासत्ता? ", असं म्हणत राणा दांपत्याला सुनावलं आहे. आणि राहूल यांचाच व्हिडीओ कोट करत रश्मी पुराणिक यांनी ट्विट केलं आहे.

धिरज कावले या वापरकर्त्याने रश्मी पुराणीक यांना आपण सत्ताधारी पक्षाच्या बाजूने विचार करताय असं म्हटलंय. "कस आहे तुम्ही सत्ताधारी दृष्ठीकोण मध्ये बघितलं म्हणून असा विचार आला. विरोधीपक्ष म्हणून बघा." असा सल्ला दिला आहे.

निखिल या वापरकर्त्याने त्यात चुकीचं काय आहे असं विचारलं आहे. तो म्हणतो, "चुकीचं काय आहे.. आई बाबा घरी नाहीत कोणामुळे तर फालतू सरकारमुळे … चुक कोणी केली सरकारने... वरून नको ते गुन्हे दाखल केले. त्यांना बोलायला यांना जमणार नाही पैसा बंद होईल ना चॅनलचा.."

राहूल शेडगे म्हणतात, "वर्षा बंगल्यावर कोळस्याने काहीतरी लिहिलेली मुलगी आणि ह्या मुलीचे संस्कार एकसारखेच वाटत आहेत...आतापासूनच ह्या मुलांना अशी शिकवण असेल तर मोठेपणी ज्यांच काय व्हायचं. कशी नीतिवान सच्चे ईमानदार समाज विधायक होणार ही मूल..." असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बहुतांशी लोक हे नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्यावर टीकाच करताना दिसतात. एक मुलगी म्हणून तिला नक्कीच तिच्या आई बाबांची आठवण आली असेल पण तिच्या कडून तिला जमत नसतानाही जबरदस्तीने कॅमेर्यावर बोलायला लावून आपल्या पुढल्या पिढीला आपण कुठे ढकलतोय याचा विचार एकदा जरूर करायला हवा.

Tags:    

Similar News