भर पावसात नवनीत राणांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

Update: 2021-07-24 04:00 GMT

राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुय. यात खारतळेगाव शेजारी असलेला नाला फुटल्याने गावात पाणी शिरले होते तर,परिसरातील दोन जण या पाण्यात वाहून गेले होते. या सर्व पूर परिस्थितीचा खासदार नवनीत राणा यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.

पावसाची संततधार सुरू असताना देखील खासदार नवनीत राणा खारतळेगाव येथे पोहचल्यात. राणा यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. खारतळेगाव हे नाल्यामुळे दोन भागात वसले आहे. पाऊस मोठ्या प्रमानात झाल्याने नाला तुडुंब भरून वाहतो आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या अधिक मदतीसाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा खासदार नवनीत राणा करणार असल्याच आश्वासन यावेळी राणा यांनी गावकऱ्यांना दिले.

Full View
Tags:    

Similar News