एकतर्फी प्रेमातून तरुणीची गोळ्या घालून हत्या; नंतर स्वतःवर सुद्धा गोळी झाडली
ग्रेटर नोएडामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटन समोर आली आहे. यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर त्या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्नू नावाची मुलगी आपल्या बहिणीसोबत बाजारात जात होती, त्यावेळी बंटी नावच्या तरुणाने तिला फोन करून थांबवले. मात्र अन्नूने ऐकले नाही, त्यामुळे रागाच्या भरात बंटीने तिच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर बंटीने स्वतःवरही गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच दादरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले असून,त्याच्यावर उपचार सुरु आहे.
अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, दोघेही दादरीचे रहिवासी आहेत. बंटी पूर्वी अन्नूच्या घराजवळ असलेल्या परिसरात राहत होता. तेव्हाच तो अन्नूच्या प्रेमात पडला. अन्नू तिला वारंवार नकार देत असे आणि याचा राग येऊन बंटीने तिला गोळ्या घातल्या.