महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..

Update: 2022-08-15 05:13 GMT

 माझ्या आतल्या वेदना कुठे सांगू?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमीत्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना अजूनही सन्मान मिळत नसल्याचा खेद व्यक्त केला आहे. स्त्री शक्तीच्या सन्मानाविषयी बोलताना ते भावूकही झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला एक वेदना व्यक्त करायची आहे. खरंतर हा विषय लाल किल्ल्याचा नसावा हे मला माहीत आहे. माझ्या आतल्या वेदना कुठे सांगू? कोणत्या ना कोणत्या कारणाने अशी विकृती आपल्यात, आपल्या वागण्यात, बोलण्यात आली आहे.. आपण स्त्रीचा अपमान करतो. महिलांचा अपमान करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मुक्त होण्याची प्रतिज्ञा आपण घेऊ शकतो का? असं म्हटण त्यांनी देशात महिलांविषयी होणाऱ्या अवमानाबद्दल आपला खेड व्यक्त केला आहे.

भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात लढाई असणार...

माझी लढाई दोन गोष्टींविरोधात असणार आहे. त्यापैकी एक आहे भ्रष्टाचार आणि दुसरी गोष्ट आणि घराणेशाही.

देशापुढे अनेक संकटं आहेत, मर्यादा आहेत. मात्र या संकटांवर पुढील 25 वर्षात उत्तर शोधलं नाही तर देश अनेक दशकं मागे जाऊ शकतो. त्यापैकी पहिलं संकट आहे भ्रष्टाचार. एकीकडे लोक गरीबीशी लढत आहेत. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे चोरी केलेला माल ठेवण्यासाठी अनेकांना जागा पुरत नाही. त्यामुळे आमच्या सरकारने लोकांच्या पैशाची होणारी चोरी रोखण्यासाठी आधार आणि मोबाईल यासारख्या आधुनिक व्यवस्थांचा वापर करून दरवर्षी 2 लाख कोटी चुकीच्या हाती जात होते. ते थेट गरज असल्यांच्या हाती पाठवायला सुरूवात केली. त्याबरोबरच बँकांना लुटणाऱ्या अनेक हात रोखले असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला निर्णायक कालखंडाची लढाई आहे. तर यामधून मोठे मोठे लोक वाचणार नाहीत, असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला. तसंच मोदी पुढे म्हणाले की, भ्रष्टाचार देशाला पोकळ बनवत आहे. मला ही लढाई लढायची आहे. यासाठी तुम्ही मला आशिर्वाद आणि साथ द्या. तरच मी ही लढाई लढू शकतो, असंही मोदी म्हणाले.

भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाल्यानंतर, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतरही लोक त्यांचे उदात्तीकरण करतात

पुढे मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाल्यानंतर, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतरही लोक त्यांचे उदात्तीकरण करतात. तसंच जोपर्यंत भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात राग निर्माण होणार नाही, तोपर्यंत देशात नवी उर्जा निर्माण होणार नसल्याचेही मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी यांनी देशातील घराणेशाही संपवण्याचे आवाहन केले. यामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, मी घराणेशाहीवर बोललो की राजकारणावर बोललो असं काही लोक म्हणतील. मात्र मी राजकारणातील घराणेशाहीवर नाही तर सर्वच क्षेत्रातील घराणेशाहीवर बोलत आहे.

ही घराणेशाही देशातील अनेक महत्वाच्या संस्था आपल्या ताब्यात घेऊन बसली आहे. त्यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे देशात भ्रष्टाचार वाढत असल्याची टीकाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.

देशातील सर्वच क्षेत्रातील घराणेशाही संपवण्याचे आवाहन..

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात घराणेशाही निर्माण झाली तर गुणी खेळाडूंना संधी मिळत नाही. त्याठिकाणी राजकारण होऊन क्षमता नसलेले लोक स्पर्धेत जात होते. त्यामुळे 75 वर्षात भारताला पदक मिळत नव्हते. मात्र आता क्रीडा क्षेत्रातील घराणेशाही संपवण्यास सुरूवात केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये भारताचा राष्ट्रध्वज सन्मानाने फडकत असून राष्ट्रगीत अभिमानाने वाजत आहे. त्यामुळे देशातील सर्वच क्षेत्रातील घराणेशाही संपवण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

पुढे मोदी म्हणाले की, मी संविधानाचे स्मरण करून तुम्हाला घराणेशाहीच्या विरोधात उभं राहण्याचे आवाहन करतो. तुम्ही घराणेशाहीच्या विरोधात पुढे आलात तरच ही समस्या मिटेल असंही मोदी यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News