मंगळवारी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. त्यानंतर काल पुणे पोलिसांनी शिवसेनेच्या अनेक पदाधीकारी व कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आपल्या पधाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी याबाबत आपली संतप्त प्रतिकिया दिली आले, शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी देखील या सगळ्या प्रकरणावरून उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हंटल आहे की, उद्या सामंत यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा स्वतःहून अगदी शेवटच्या क्षणी बदलला असा आम्हाला दाट संशय आहे. कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्न केल्याच्या केसेस टाकल्या गेल्या आहेत. हे अत्यंत वाईट असल्याचं म्हणत त्यांनी आम्हाला पोलिसांवर विश्वास असल्याचं म्हंटल आहे.
सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर ३५३,१२०,३०७,३३२ कलमान्वे गुन्हा दाखल केला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेनेच्या पधाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणी अशा प्रकारे शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याचं म्हणत मनीषा कायंदे यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे.