आधिच लोक ब्लड प्रेशर, मधुमेह अशा गोष्टींनी त्रस्त होते. त्यात भर पडलेय ती म्हणजे या कोरोनाची. या सर्व आजारांपासून आपल्या कुटुंबाला दुर ठेवायचं असेल तर टॉप तीन गोष्टी पाळल्या पाहिजेत. आहारात, दैनंदिन जिवनात काही बदल केले पाहिजेत.
या तीन गोष्टीं बाबत मार्गदर्शन करताना आहारा तज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणाल्या की,
1)"पॅकेट फुड बंद केलं पाहिजे. आपण जेवढ पॅकेट मधील पदार्थ खातो तेवढी आपली प्रकृती बिघडते. अगदी रेडीमेड पदार्थ खायचेच झाल्यास घरगुती पध्दतीचे, महिला उद्योगांनी केलेले खावेत."
2) "मराठी पुरुषांनी आपली मानसिकता बदलावी लागेल. ते आता किचनमध्ये दिसले पाहिजेत. पौस्टिक स्वयंपाक ही केवळ महिलेची जबाबदारी नसुन पुरुषांची देखील आहे. घरकाम केल्याने मर्दानगी कमी होत नाही तर वाढते."
3) "किचनमध्ये नॉन स्टीक भांडी शक्यतो वापरु नयेत. आपण पारंपरिक भाड्यांचा वापर कमी केल्याने अन्नातील सुक्ष्म पोषण नाहिसे होतात. त्यामुळे आपला पारंपरिक भांडी वापरण्याकडे कल असावा. लोखंडी तवा, लाकडी रवी, पितळेची कल्हई केलेली भांडी वापरावीत."
पाहा काय म्हणाल्या ऋजुता दिवेकर...