मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कन्या पूर्वा पाटील यांना कोरोनाची लागण...
पूर्वा पाटील यांचा परवा वाढदिवस होता त्या दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांना लक्षणे आढळल्यास कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन....
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे-पाटील यांना सुद्धा आता कोरण्याची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती आणि त्यानंतर आता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, कोरोना सदृश लक्षणं दिसत असल्याने टेस्ट केल्यानंतर माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. राष्ट्रवादी भवन, मुंबई व इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
पूर्वा पाटील यांचा वाढदिवस होता आणि या दरम्यान त्यांना अनेक लोक देखील भेटले होते. त्याचबरोबर त्या राष्ट्रवादी भवन व नियमित कामासाठी इतरही ठिकाणी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना लक्षणे आढळल्यास कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन देखील केले आहे.