आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार केला जाणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. आता तुम्हाला हा निकाल कसा पाहायचा हा प्रश्न असेल तर तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला हा निकाल कसा पाहायचा हे अगदी टप्प्याटप्प्याने समजावून सांगणार आहोत..
निकाल जाहीर होण्यापूर्वी बोर्डाची पत्रकार परिषद..
दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. यासोबत किती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले? आणि राज्याचा एकूण निकाल किती लागला? या सगळ्याविषयी विभागामार्फत माहिती दिली जाईल आणि त्यानंतर म्हणजेच दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल..
Online निकाल कसा चेक करायचा?
सर्वात प्रथम शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा
त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका
निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल...
मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या जे तुम्हला इरत ठिकाणी कमी येईल..