लेस्बियन जोडी सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुफी मलिक आणि अंजली चक्र यांचं ब्रेकअप
पाकिस्तानी आणि भारतीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुफी मलिक आणि अंजली चक्र यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. दोघी लवकरच लग्न करणार होत्या, पण सुफीने अंजलीला फसवल्याने हे लग्न मोडलं आहे.;
पाकिस्तानी आणि भारतीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुफी मलिक आणि अंजली चक्र यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. दोघी लवकरच लग्न करणार होत्या, पण सुफीने अंजलीला फसवल्याने हे लग्न मोडलं आहे.
सुफी आणि अंजली यांची पहिली भेट २०१७ मध्ये टम्बलरवर झाली होती. २०१९ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत असायचे.
सुफीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, "मी आमच्या लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी तिची फसवणूक करून तिचा विश्वासघात करून चूक केली. मी तिला खूप दुखावलं आहे. मला माझी चूक मान्य आहे आणि भविष्यातही मी ती चूक मान्य करेन."
अंजलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, "मी आणि सुफीने पाच वर्षांहून अधिक काळ एकत्र घालवला. यादरम्यान तुम्हा सर्वांचंही खूप प्रेम आम्हाला मिळालं. तुम्हाला हे ऐकून धक्का बसू शकतो, पण आता आम्ही दोघी आमचे मार्ग वेगळे करत आहोत. सुफीने केलेल्या बेवफाईमुळे आम्ही आमचे लग्न रद्द करण्याचा आणि आमचे रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला आहे." अशी माहिती अंजलीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे
तर दोघींनीही एकमेकांबद्दल नकारात्मकता न पसरवण्याची विनंती चाहत्यांना केली आहे.