लालू प्रसाद यादव यांचा जीव त्यांची मुलगीच वाचवणार...

Update: 2022-11-10 08:43 GMT

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे . बऱ्याच आजारांनी ते त्रस्त असतात. पण यामागचं कारण त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यामुळे डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठीच २० ते २४ नोव्हेंबर यादरम्यान लालूप्रसाद यादव हे सिंगापूरला जाणार आहेत.

सिंगापूर येथील उपचारादरम्यान लालूप्रसाद हे त्यांच्या मुलीच्या घरी राहणार आहेत.त्यांची मुलगी रोहिणी आचार्य ही सिंगापूर मध्येच राहते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंगापूर मध्ये राहणारी लालूप्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य ही आपल्या वडिलांना म्हणजेच लालूप्रसाद यादवांना किडनी देणार आहे. त्यासाठी लालूप्रसाद यादव हे सिंगापूरला त्यांच्या मुलगी कडे जात आहेत. रोहिणी आचार्य ही लालूप्रसाद यादव यांची दुसरी मुलगी आहे.

मुलीची किडनी घेण्यास लालू प्रसाद तयार नव्हते ...

असं म्हटलं जात आहे की लालूप्रसाद यादव हे मुलगीची किडनी घ्यायला तयार नव्हते . पण आपल्या वडिलांसाठी रोहिणीने त्यांना किडनी देण्याचा आग्रह केला. जर परिवारातील सदस्याची किडनी ट्रान्सप्लांट केली ,तर फायद्याचे असते .त्यामुळे रोहिणीने हा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध सेंटर फॉर किडनी डिसीज मधून लालूप्रसाद यांच्यावर उपचार चालू आहेत.

रोहिणी आचार्य हिने घेतलेला हा निर्णय धाडसी आणि कौतुकास्पद आहे . आपल्या वडिलांसाठी असलेली तळमळ रोहिणी आचार्य यांच्या निर्णयातून स्पष्ट होत आहे .

Tags:    

Similar News