कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव (Aishwarya jadhav kolhapur) हिची आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंड येथे होत असलेल्या विम्बल्डन (wimbledon 2022) स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाली. या स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झालेली ऐश्वर्या जाधव हि देशातील एकमेव टेनिसपटू ठरली आहे. तसं पाहिलं तर कोल्हापूरला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा आहे. कुस्ती सारख्या खेळात कोल्हापूरच्या मल्लांनी जगभरात नावलौकिक मिळाला. कोल्हापूर शहराला मिळालेला हा क्रीडा क्षेत्राचा वारसा ऐश्वर्या पुढे घेऊन जात आहे. आता ऐश्वर्याने इतकी मोठी कामगिरी केली आहे खरी, पण याची दखल मात्र कुठल्याही माध्यमाला घ्यावीशी वाटली नाही. काही माध्यमांनी घेतली पण ती फक्त एक कॉलमच्या बातमी पुरती. राजकीय घडामोडींच्या पाठीमागे टीआरपी साठी लागलेल्या माध्यमांनी ऐश्वर्याने मिळवलेल्या या यशाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. हीच खंत डॉ. प्रशांत भामरे या ट्विटर वापरकर्त्याने ट्विटर द्वारे व्यक्त केली.
एकाही चॅनेलला ही बातमी दाखवलेली नाही.
— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) July 10, 2022
कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव १४ वर्षा खालील मुलांत
विंबल्डन मधे खेळत आहे. शेअर करा.... pic.twitter.com/2fCnxc9XCG
ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे. तेरा वर्षाच्या या मुलीने जागतिक ज्युनिअर टेनिस संघात स्थान मिळवले. आणि आता ती इंग्लंड येथे होत असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होणार आहे. ऐश्वर्याने हे इतकं मोठं यश वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी मिळवला मात्र या यशाचं कौतुक कुठल्याच माध्यमांना करावं असं वाटलं नाही. दिवस-रात्र राजकीय घडामोडींच्या पाठीमागे धावणाऱ्या या माध्यमांना आता खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सुनावला आहे. त्यांनीदेखील डॉ. प्रशांत भामरे यांचा हा व्हिडिओ शेअर करत म्हंटलं आहे की, राजकारण रोजचेच आहे..त्या पलीकडे देखील जग आहे.. महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे..जय महाराष्ट्र !
राजकारण रोजचेच आहे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 10, 2022
त्या पलीकडे देखील जग आहे..
महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे..
जय महाराष्ट्र !@abpmajhatv @saamTVnews @khareviews @OfficeofUT @supriya_sule @sahiljoshii @PMOIndia @TV9Marathi @CMOMaharashtra @AUThackeray https://t.co/WLlx16YLQb
TRP च्या पाठीमागे धावणाऱ्या माध्यमांमधून ऐश्वर्याचं हे यश दुर्लक्षित झाला असलं तरीही तिची कामगिरी सर्वांना हेवा वाटावी अशी आहे.