धनंजय मुंडे यांना काहीही झालेलं नाही ते नौटंकी करत आहेत; करूणा मुंडेंचा आरोप

Update: 2022-04-17 15:23 GMT

 करूणा धनंजय मुंडे यांच्याशी मॅक्स वुमनने कोल्हापूर पोटनिवडणूकीवर बातचीत केली. या दरम्यान आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी त्यांना आपण धनंजय मुंडेंची त्यांच्या आजारपणात भेट घेतलीत का असा प्रश्न विचारला त्या उत्तरामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांना काहीही झालेलं नाही ते नौटंकी करत आहेत असा धडधडीत आरोप केला.

मी कोल्हापूर पोटनिवडणूकीत होती. मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना काहीही झालेलं नाही आणि त्यांना काही होत बित नाही. गेल्या २५ वर्षांपासून मी त्यांची ही नौटंकी पाहतेय. त्यांनी काहीही होत नाही. शिवाय हे लोक आजारी पडल्यावर यांना सरकारी रूग्णालयात का दाखल केलं जात नाही. जनतेच्या पैशातून फक्त पंचतारांकीत रूग्णालयातच का दाखल केलं जातं. पंचतारांकीत हॉटेलसारख्या खोलीत हे आरामात पडून असतात. यांना काहीही झालेलं नसतं.

गेल्या पंचवीस वर्षांपासून मी त्यांची नौटंकी पाहतेय. त्यांना तीन वेळेस कोरोना झाला पण मी आणि माझी मुलं त्यांच्यासोबत राहत असून देखील आम्हाला एकदाही कोरोनाची लागण झाली नाही, कशी? वेळ आल्यावर त्यांच्या नौटंकीचा सगळा खुलासा मी येत्या काही दिवसात नक्की करणार आहे.

Tags:    

Similar News