हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपला त्याची पुर्व पत्नी देणार 116 कोटींची नुकसानभरपाई
मागच्या अनेक दिवसांपासून हॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते जॉनी डेप आणि त्याची पुर्व पत्नी अंबर हर्ड यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहेत. जॉनी डेप यांच्यावर त्यांच्या पत्नीने लैगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या सगळ्या प्रकरणाबाबद न्यायालयात सुनावणी देखील सुरू होती. त्यामुळे या खटल्यात नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्यानंतर अखेर काल बुधवारी व्हर्जिनिया न्यायालयाने या संदर्भातील निर्णय दिला आहे. 6 आठवडे चाललेल्या या सुनावनीत जॉनी डेपला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जॉनी डेप यांच्या पत्नीला आता नुकसानभरपाई म्हणून $15 दशलक्ष (सुमारे 116 कोटी रुपये) इतके पैसे जॉनी डेप याना द्यावे लागणार आहेत. त्याच वेळी, डेप यांना सुद्धा पत्नीला 2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 15.5 कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील न्यायालयाने दिला आहे.
हर्डने डेपवर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला. त्यानंतर अभिनेत्याने हर्डच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. अभिनेत्री अंबर हर्ड हिने जॉनी डेपवर अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा दावा केला होता. आता न्यायालयाच्या निर्णयालानंतर हर्ड यांनी हा नीकाल निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. तर ज्युरींनी मला माझे आयुष्य परत दिले असं म्हणत डेप यांनी नीकालानंतर सर्वांचे आभार व्याक्त केले आहेत..
ज्युरीने डेप आणि अंबर हर्ड या दोघांनाही बदनामीसाठी जबाबदार धरले आहे. ज्युरीला असेही आढळले की डेपचे वकील अॅडम वाल्डमन यांनी हर्डच्या विरोधात विधाने केली ज्यामुळे त्याची प्रतिष्ठा दुखावली गेली. त्यामुळे हर्डला 2 दशलक्ष डॉलर्सची भरपाई देखील मिळेल.
या निकालावर प्रतिक्रिया देताना हर्डने महिलांसाठी हा धक्का असल्याचे म्हटले आहे. आज मला जी निराशा वाटते ती शब्दांपलीकडची आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या अमर्याद शक्ती, प्रभाव आणि प्रभावाचा सामना करण्यासाठी इतके पुरावे पुरेसे नव्हते याचे मला दु:ख अहे. या निर्णयामुळे इतर महिलांनाही धक्का बसेल. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराचे गांभीर्य कमी होईल असं त्यानी म्हंटलं आहे.