जैकलीन फर्नांडिस साठी सुकेश चंद्रशेखरने आणखीन काय काय खरेदी केलं होतं आलं समोर..

Update: 2022-09-01 06:29 GMT

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपपत्रात ईडीने मोठे खुलासे केले आहेत. मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने ( Sukesh Chandrashekhar ) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला फक्त घोडा, मांजर आणि दागिने भेट दिले नाहीत तर अभिनेत्रीसाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते. बहारीन व मुंबईतही प्रत्येकी एक घर घेण्यासाठी ऍडव्हान्स रक्कम दिली होती. जॅकलिनचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात.

सुकेश हा फसवणूक करणारा होता हे जॅकलिनला ( jacqueline fernandez ) माहीत होते, असा दावाही ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. त्याच्यावर खटला सुरू आहे. सुकेशने तिला श्रीलंकेत घर घेण्याबाबत सांगितले होते, अशी कबुली जॅकलिनने दिली आहे. जरी ती त्या घरात कधी गेली नाही. ही मालमत्ता श्रीलंकेतील वेलिगामा येथे असल्याचे सांगितले जात आहे. हे श्रीलंकेचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

याशिवाय जुहू येथील बंगलाही बुक करण्यात आला होता. एवढेच नाही तर त्याने जॅकलिनच्या आई-वडिलांना बहरीनमध्ये घर भेट म्हणून दिले होते. या मालमत्तांच्या खरेदीची माहिती सुकेशने त्याची सहकारी पिंकी इराणी यांना दिली होती. पिंकी हीच महिला होती जिला सुकेश आणि जॅकलीनशी मैत्री करण्याचे टास्क देण्यात आले होते, त्या बदल्यात पिंकीला करोडो रुपयेही देण्यात आले होते.

ईडीने म्हंटले आहे की, जॅकलीन सर्व काही माहीत असूनही गिफ्ट घेत राहिली. मात्र, यापूर्वी जॅकलिनने सुकेशची खरी ओळख माहित नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. सुकेशला ती शेखर म्हणून ओळखत होती, जो एका प्रसिद्ध राजकीय कुटुंबातून आला होता. पण ईडीचा आरोप आहे की, महिन्याभरातच जॅकलिनला बातमीच्या माध्यमातून कळले की ती सुकेश चंद्रशेखर आहे, तरीही तिला महागड्या भेटवस्तू मिळत राहिल्या व ती त्या स्वकारात राहिली..

17 ऑगस्ट रोजी पटियाला कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनवर सुकेशकडून 5.71 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. सुकेशच्या कामाची माहिती असतानाही जॅकलीन सुकेशकडून भेटवस्तू स्वीकारल्या असेही ईडीने म्हटले आहे. याप्रकरणी ईडीने जॅकलिनलाही सहआरोपी केले आहे.

आरोपपत्रानुसार, सुकेशने केवळ जॅकलिनच्याच नव्हे तर तिचा भाऊ आणि बहिणीच्या सहलींसाठी आर्थिक मदत केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने जॅकलिनच्या बहिणीला 1 लाख डॉलर (अंदाजे 79,42,000 रुपये) आणि भावाला 2,67,40 ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे 14,79,267 रुपये) भेट दिले होते. याशिवाय त्यांनी अभिनेत्रीला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या.

जॅकलिन 26 सप्टेंबरला कोर्टात हजर राहणार आहे

दिल्लीच्या पटियाला कोर्टात बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यानंतर अभिनेत्री जॅकलिनला समन्स बजावून २६ सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी, 12 सप्टेंबरला दिल्ली पोलीस चौकशीही करणार आहेत. 12 सप्टेंबरला दिल्ली पोलीस जॅकलिनची चौकशीही करणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या या चौकशीत ईओडब्ल्यूच्या लोकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

Tags:    

Similar News