फडणवीस आणि नवनीत राणा यांच्या फोटोवरून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेणे काँग्रेसला शोभतं का?
एखादा फोटो दाखवून त्यांची बदनामी करण्यासाठी थेट एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणे कितपत योग्य आहे?;
महाराष्ट्राच्या राजकारणात नवनीत राणा हे नाव मोठं चर्चेत आहे. नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी त्या अटकेत आहेत. हे सगळं होत असताना ज्यावेळी त्यांना कोठडीत नेले गेले त्यानंतर त्यांनी, अनुसूचित जाती ची असल्याने मला पाणी दिले नाही आणि वॉशरूम वापरु दिले नाही असे गंभीर आरोप थेट पोलीसांवरच केले. त्यांच्या या आरोपानंतर सर्वांचाच एक धक्का बसला पण त्यानंतर लगेच नवनीत राणा यांनी केलेले हे सर्व आरोप खोटे असल्याचं पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक ट्विट करून सांगितलं. या सगळ्या घडामोडी होत असताना या प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उडी घेतली व नवनीत राणा प्रकरणावरून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
त्यानंतर समाज माध्यमांवर देवेंद्र फडणवीस आणि खासदार नवनीत राणा यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये नवनीत राणा या देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देत आहेत. आणि या वेळी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे पाहत आहेत. त्यांचा व्हायरल होत असलेला हा फोटो काँग्रेसचे नेते, प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट केला आहे. त्यांनी फोटो ट्विट करत म्हंटले आहे की, पलट ये तेरा ध्यान किधर है देवेंद्र @Dev_Fadnavis जी! लेटर तो इधर है।
पलट ये तेरा ध्यान किधर है देवेंद्र @Dev_Fadnavis जी!
— Surendra Rajput (@ssrajputINC) April 27, 2022
लेटर तो इधर है। pic.twitter.com/IRthEYG2MN
खरतर देवेंद्र फडणवीस हे एक महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे ते जिथे कुठे जातात तिथे त्यांच्या पाठीमागे कॅमेऱ्यांचा गराडा असतो. त्यामुळे असा काही एखादा फोटो कॅमेरात कैद होतो आणि नंतर मग तो अशा प्रकारे व्हायरलं केला जातो. खरं तर असा एखादा फोटो व्हायरल करून त्या व्यक्तीच्या थेट चारित्र्यावर संशय घेणे हे कितपत योग्य आहे?
इतकच नाही सुरेंद्र राजपूत यांनी जे ट्विट केला आहे. त्या ट्विटला अनेक कमेंट्स आले आहेत तर अनेकांनी रिट्विट केलं आहे. या सगळ्या कॉमेंट्स मध्ये अनेक कमेंट्स या अशाच प्रकारच्या फडणवीस यांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या आहेत तर अनेकांनी सुरेंद्र राजपूत यांनी शेअर केलेल्या या फोटोवरून चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
आरकेनिगम यांनी राजपूत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेसचे तुम्ही अधिकृत प्रवक्ते आहात अशी अशोभनीय कमेंट अपेक्षित नाही. हे तुमच्या पक्षांचे विचार दर्शवत आहेत. पण आपली जशी मर्जी आपली जशी नजर आहे त्यासाठी शुभेच्छा
काग्रेस के अधिकृत प्रवक्ता के बतौर, ऐसा अशोभनीय कमेंट अपेक्षित नहीं होता, यह पार्टी के बिचारों को दर्शाता है,फिर आप की जैसी मर्जी ,आपकी जैसी नजर आपको मुबारक हो।
— rknigam, (@rajendranigam) April 27, 2022
आयएमजमशेध यांनी सुद्धा राजपूत यांच्या या ट्विटला उत्तर देत म्हटले आहे की, ते कुठेही बघत असतील तर तुम्हाला अशी कमेंट करणं शोभा देत नाही.
वो कहीं भी देख रहें हों आप को ऐसे comment सोभा नहीं देते
— @imjamshed432 (@imjamshed432) April 27, 2022
संस्कृत मानव अशा नावाने असलेल्या ट्वियेर वापरकर्त्याने त्यांना उत्तर देत म्हटले आहे की, तुमचे विचार किती खालच्या पातळीचे आहेत हे दाखवणारे हे ट्विट आहे. हे ट्विट तुम्ही डिलिट करणं योग्य राहील असं म्हंटल आहे..
बहुत गन्दी सोच दर्शा रहा ये ट्वीट डिलीट कर देना ही बेहतर
— सुसंस्कृत मानव (@indianlegend_11) April 27, 2022
डॉ. नवीन टेलर यांनी सुद्धा त्यांच्या या ट्विटला उत्तर देत राजपूत यांना चांगलेच सुनावले आहे त्यांनी म्हटले आहे की, इस फोटो को ट्वीट करने वाले की सोच क्या हो सकती है??? बहुत ही घटिया दर्जे की मानसिकता को दर्शा रहा है... फोटो को क्लिक होते टाईम अगर किसी के चेहरे को देखकर पुरूस्कार की तरफ देखेगा तो एसी फोटो आ सकती है...
इस फोटो को ट्वीट करने वाले की सोच क्या हो सकती है??? बहुत ही घटिया दर्जे की मानसिकता को दर्शा रहा है... फोटो को क्लिक होते टाईम अगर किसी के चेहरे को देखकर पुरूस्कार की तरफ देखेगा तो एसी फोटो आ सकती है...
— Dr Naveen Tailor 🇮🇳 (@drnaveentailor) April 27, 2022
सुरेंद्र राजपूत यांनी केलेल्या या ट्विटला अनेक रिट्विट व कॉमेंट्स आल्या आहेत. यामध्ये अनेक अशा कमेंट्स आहेत ज्या आम्ही तुम्हाला दाखवू देखील शकत नाही. खरंतर असा एखादा फोटो दाखवून त्यांची बदनामी करण्यासाठी थेट एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणे कितपत योग्य आहे?