केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा राज्य सरकारने नितीन गडकरींचा आदर्श घ्यावा: रक्षा खडसे
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गडकरींनी राज्य सरकारवर कोणताही आरोप न करता राजकारण केलं नाही, केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोरोना आटोक्यात आणण्यात मोठा वाटा उचलला आहे. गडकरींचा हा आदर्श राज्यसरकारनं घ्यायला हवा तसंच ही वेळ राजकारणाची नसून केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधला पाहिजे. तो का साधला जात नाही. असा सवाल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आघाडी सरकारला केला आहे .
राज्यातील मंत्र्यांनी केंद्रावर आरोप करण्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधून राज्यासाठी मदत का करत नाही? असा सवाल ही आघाडी सरकारच्या मंत्र्यांना भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. पीएम केअर फंड मधून राज्यभरातील जिल्ह्यात व्हेंटिलेटर दिले आहेत. त्यातील अनेक नादुरुस्त याकडे सरकार आणि प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.