वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक
गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रदेखील एकप्रकारचा व्यवसाय झाला आहे. लाखो रूपयांच्या फीज पालक भरत असतात. यामुळेच मग माफियांना देखील इथेच शिरकाव करायला जागा मिळते. आपण नुकतीच नीट परीक्षा पास झाला असाल आणि जर कुणी मेडिकल कॉलेज मध्ये एडमिशन करून देवू असं आमिष दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा. बीडच्या परळी मध्ये नुकतीच नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीला दोन भामट्यांनी 14 लाखांचा गंडा घातला आहे.
मेडिकलच्या ऍडमिशन साठी हि विद्यार्थिनी पाँडिचेरी पर्यंत पोचली होती. मात्र वेळीच फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानं अधिक लाटली जाणारी रक्कम रोखता आली. साक्षी फड असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. साक्षीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून संभाजी नगर पोलीस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.