राणेंच्या वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यदने दिली प्रतिकिया;म्हणाली...

नारायण राणेंच्या अटकेनंतर सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत असून, अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.;

Update: 2021-08-24 15:13 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. तर याच मुद्यावर बोलताना शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया देत राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्या एका खाजगी वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे पूरग्रस्त भागांची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत लोकांना मदत केली पाहिजे. जनतेच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे.मात्र या सर्व परिस्थितीवर राणे बोलत नसल्याचा टोला दीपाली सय्यद यांनी राणेंना लगावला.

राणे हे शिवसेनेतून गेले असले तरी शिवसेनेचा बाणा असला पाहिजे. एक शिवसैनिक आपल्याच भावाला अस बोलत असेल तर ते चुकीचे आहे. ते ज्या पद्धतीने वागत आहेत ते शिवसेनेचे रक्त नाही. शिवसेनेचे रक्त त्यांनी शोधले पाहिजे आणि ते शोधले तर ते त्यांचे वक्तव्य मागे घेतील असे मत त्यांनी सय्यद यांनी व्यक्त केले.

कोरोना काळात अनेक लहान उद्योग विस्कळीत झालेत. त्यांना परत ताकद देण्यासाठी राणे यांनी आपल्या खात्याकडे पूर्ण लक्ष घातले पाहिजे. त्यांनी तिकडे लक्ष घातले तर सर्वसामान्यांचे घर पुन्हा एकदा उभे राहिले असेही दीपाली सय्यद म्हणाल्या.

Tags:    

Similar News