सृष्टीची जननी म्हणून स्त्रीची ओळख असावी. आजच्या जगात महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. चुल आणि मुलं सांभाळून देखील स्त्री हि डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट इत्यादी म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहे. एका महिलेला नोकरी महत्त्वाची जरी असली तरी तिचे संपूर्ण लक्ष आपल्या घरातच असते. असंख्य लपलेले गुण असूनही तिला चार भिंतींच्या आत राहावे लागते.
घरी यातना सहन करा. समाजात राहताना स्त्रीवर कधी ना कधी अन्याय होतोचं. तेव्हा त्यांच्या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा. त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रूपाने शासनाकडून मदत मिळावी. या साठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर नेहमीचं कार्यरत असतात, ज्या महिलांवर अन्याय झाला आहे अशा महिलांसाठी महिला आयोग एक सहाय्यक प्रणाली म्हणून कार्यरत आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कि कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार टाळण्यासाठी प्रत्येक ऑफिस मध्ये आयसीसी केंद्र असलचं पाहिजे, आणि जरी कायद्यावरती या पद्धतीचं जीआर असलं तरी प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. महाराष्ट्रात ३५% महिला या वर्किंग वूमन म्हणून काम करतात. या महिलांसाठी हि आयसीसी कमिटी कार्यरत असलीच पाहिजे. उशिरा दिलेलं न्याय हा अन्याया सारखा असतो, या मताच्या रुपाली चाकणकर आहेत, निश्चित पणे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा देण आणि पिढीला न्याय देणे हे राज्यामंडळ आयोगच काम आहे. त्यातच राज्यामहिला आयोगच ब्रीद वाक्य स्त्री शक्ती रे फुले सदाबहर, स्त्री ची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही
अन्याय झालेल्या महिलांना वेळेत न्याय मिळवा शिवाय, त्यांचे प्रश्न त्वरीत सोडवले जावे, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, मालमत्तेच्या वादातून निर्माण होणारे प्रश्न आणि शाब्दिक आणि शारीरिक छळ हे महिलांवरील मुख्य अन्याय आहेत. त्यांच्या भीतीमुळे आणि अज्ञानामुळे या महिला घाबरल्या आहेत. तेव्हा या महिलांनी कोणतीही भीती न बाळगता त्यांच्या समस्या घेऊन आयोगाकडे यावे. नक्कीच महिला आयोग त्यांच्या समस्यांना सोडवण्याच्या प्रयत्न करेन.