विविध वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लसीकरण संदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये, हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असं म्हंटलं आहे.
केंद्र सरकारकडून २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाचे आकडे वाढत असून,लसीकरण मोहीमेला वेग आला आहे.
लसीकरण मोहिमेत वाढ झाल्याने अमृता फडणवीस यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ट्विटसोबत त्यांनी भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी सुद्धा पोस्ट केली आहे.