घरात लहान लेकरं असतील तर घरातील कपडे, बेडशीट, सोफा, इतकंच काय घराच्या भिंती सुद्धा कधी रंगून जातात समजत नाही. त्या लेकराच्या हातात कोणतीही गोष्ट मिळाली की ते घरभर लावत फिरतात.. आता घरातील महिलांचे नेलपेंट समजा एखाद्या लेकराच्या हातात मिळालं तर ते लहान लेकरू काय करेल? तुम्ही म्हणाल अहो काय करेल काय हे काय विचारता? घरातील सगळ्या बेडशीट, पडदे, सोफा, कपडे सगळं रंगवून सोडेल.. असं कधी झालंच तर.. बापरे, ते डाग तसेच राहतील ना? अजिबात नाही तुम्ही घरच्या-घरी हे डाग घालवू शकता...
नेलपेंटचे डाग काढण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो.
सर्व प्रथम ज्यावरती नेलपेंटचे डाग लागलेले आहेत ते कापड 1 लिटर सामान्य पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवा.
आता लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण तयार करा.
पाण्यातून कापड काढा आणि डाग असलेल्या भागावर मिश्रण घाला.
क्लिनिंग ब्रशने ते स्वच्छ करा.
यानंतर पाण्याने धुवा.
डाग सहज निघून जाईल...
मग ही घरगुती ट्रिक कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो याचा कधी तुम्ही वापर केलाच तर तो अनुभव देखील नक्की शेअर करा...