Google Doodle - आज गूगलने ज्यांचे डूडल बनवले आहे त्या मिशीयो शुजीमुरू कोण आहेत ?

Update: 2021-09-17 04:48 GMT

जपानच्या केमिस्ट मिशीयो शुजीमुरू (michiyo tsujimaru) यांचे Doodle आज Google बनवले आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज गुगलने हे डूडल बनवले आहे. मिशीयो शुजीमुरू या एक जपानी कृषी वैज्ञानिक होत्या. त्यांनी ग्रीन टी वरती अभूतपूर्व असा रिसर्च केला होता. त्या कृषिक्षेत्रात डॉक्टरेट मिळवलेल्या जपानमधील पहिल्या महिला होत्या. त्यांचा आज 133 वा जन्मदिवस आहे. जन्मदिनानिमित्त गूगलने त्यांना डूडलच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.

कोण आहेत या मिशीयो शुजीमुरू?

18 सप्टेंबर 188 ला जपान मधील ओकेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांनी तिथेच आपल्या करिअरला सुरवात केली. 1920 साली त्यांनी वैज्ञानिक शोधप्रबंधावर आपले लक्ष केंद्रित केले. सुरवातीला त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन केले व त्यांनी होक्काइडो इम्पीरियल यूनिवर्सिटी मध्ये लॅब असिस्टंट म्हणून कामास सुरवात केली.

हे काम करत असताना त्यांना वेगवेगळे अनुभव आले. त्यानंतर त्यांची बदली टोक्यो इम्पीरियल यूनिवर्सिटी मध्ये झाली. याठिकाणी त्यांना उमेतारो सुजुकी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी ग्रीन बायोकेमिस्ट वर सर्च केला. आणि त्यानंतर दोन वर्षानंतर ग्रीन-टी मध्ये विटामिन सी चा शोध त्यांनी लावला. त्या नंतरच अमेरिकेत ग्रीन-टी च्या निर्यातीत वाढ झाली.

आशा या जपानी कृषी वैज्ञानिक michiyo tsujimaru यांचा आज 155 व जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना गूगल ने देखील अभिवादन केले आहे.

Tags:    

Similar News