सोन्याचांदीच्या भावात चढ उतार सुरूच; सोने 400 रुपयांनी तर चांदी 700 रुपयांची घसरण ..
सोन्याचांदीच्या भावात चढ उतार सुरूच; सोने 400 रुपयांनी तर चांदी 700 रुपयांची घसरण ..;
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ उतार सुरू आहे जळगाव सराफा बाजारात सोन्याचा भाव 24 कॅरेट प्रति तोळ्यासाठी ( 10 ग्राम) 47 हजार 565 रुपये भाव आहे कालच्या पेक्षा 400 रुपयांनी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.
तर चांदी च्या भाव प्रति किलो 66 हजार 877 रुपये इतका आहे म्हणजेच चांदीच्या भावात काल पेक्षा 700 रुपयांनी भाव घसरले आहेत
गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात सोन्याच्या भाव विक्रमी पोहचला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने भावात चढ उतार सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती , डॉलरचे भाव तसेच क्रूड ऑइल, शेअर मार्केट , सट्टा बाजार ह्या कारणांनी सोन्याच्या भाव चढउतार ह्यावर अवलंबून असतात.
आता सद्या सोन्याच्या भावात घसरण सुरू आहे मात्र आगस्ट महिन्यापासून सणांना सुरवात होते नंतर आणि दिवाळी सन जवळ येत असल्याने सोन्याचे भाव वाढू शकतात असा अंदाज तंज्ञानी व्यक्त केला आहे.