कोरोना काळात आंदोलन कसं करावं, कचरावेचीकांनी राजकीय नेत्यांसमोर ठेवला आदर्श

Update: 2021-06-28 09:46 GMT

पुणे: सरकारने काही प्रमाणात सूट देताच, राजकीय नेत्यांकडून हजारोंच्या संख्येनी लोकांना जमा करून विविध मागण्यासाठी आंदोलने केली जात. मात्र राजकीय नेत्यांना लाजवेल असं आंदोलन पुण्यातील कचरावेचीकांनी केलं आहे. तसेच कोरोना काळात आंदोलन कसे करावे याचा आदर्श सुद्धा ह्या कचरावेचकांनी घालून दिला आहे.

राज्यात सद्या अनेक विषयांवरून राजकीय नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या आंदोलनात अनेक राजकीय जेष्ठ नेत्यांचे सुद्धा सहभाग पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करण्याचे नियम असतनाही ही राजकीय नेते सर्व नियम पायदळी तुडवून आंदोलन करत आहे.




 एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे पुण्यात महापालिकेसमोर महिला कचरावेचीकांनी केलेल्या आंदोलनाच कौतुक होत आहे. आंदोलनाला नियमा प्रमाणे फक्त ५० कचरा वेचक उपस्थित होते. तर कोणतेही गर्दी न करता व्यवस्थित जागा ठेवून एका रांगेत बसून हे आंदोलक शांतपणे आपली भूमिका मांडत आहेत. विशेष म्हणजे घोषणा देताना देखील आपल्या तोंडाचा मास्क निघणार नाही, याची काळजी सुद्धा आंदोलक घेतांना पाहायला मिळाले. त्यामुळे हजारोंची गर्दी करून आंदोलन करणाऱ्या राजकीय नेत्यांनी कचरावेचकानी केलेल्या आंदोलकांचा आदर्श घेतला पाहिजे.



 


Tags:    

Similar News