लग्नाचं अमिष दाखवायचं, भुलथापा द्यायच्या, विश्वास संपादन करून अलगद देहबाजारात विक्री करायची असा धंदा चालवणारं मोठं रॕकेट देशभरात काम करतंय. नाशिक शहरातही या रॕकेटची पाळेमुळे असल्याचं आता निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या सातपुर पोलीसांनी अशाच एका दलाल टोळीच्या मुसक्या बांधल्या आहेत.
या बाबत बोलताना सातपुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे म्हणाले की, “आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली होती की, तिच्या बहिणीला कुणीतरी फुस लाऊन गुजरातला नेलं आहे. त्यानंतर पोलीस तपासात सदर तरुणी गुजरातमध्ये असल्याचं निश्पन्न झालं. या मुलीची विक्री करण्यात आली होती. या मुलीला पोलीसांनी राजस्थान येथून ताब्यात घेतले. सोबतच आणखी दोन मुलींची सुटका करण्यात आल्याचं पोलीसांनी सांगीतलं.
https://youtu.be/wep2g2YN50g