एक महिलेला एका नंबर वरून कॉल आला पुढून कोणतीही व्यति बोलत नव्हती परत वेगवेगळ्या नंबरवरून त्या महिलेला संध्याकाळी अश्लील मेसेज पाठवले जात होते. या सगळ्या संदर्भात या महिलेने ट्विटर च्या माध्यमातून या घटनेची दखल घ्यावी म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह सायबर क्राइमला टॅग केलं होतं. रुपाली चाकणकर यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली जाईल असं रिट्विट केलं आहे.
महिलेने जे ट्विट केलं आहे त्यामध्ये म्हंटल आंहे की, +919156391732 काल या नंबर वरुन फोन आला समोरुन कोणतीही व्यक्ती बोलली नाही आणि संध्याकाळी वेगवेगळ्या नंबरवरून अश्लील मेसेज फोटो येऊ लागले. @MahaCyber1 आणि रुपाली चाकणकर आपण हि गंभीर बाब समजुन तत्काळ दखल घ्यावी. रँडम नंबरला कॉल करुन महिलांना त्रास देणारी हि टोळी असु शकते. अस या महिलेने म्हंटल आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तत्काळ दखल घेतली जाईल अस रीट्विट केलं आहे.