रेणू शर्मा विरोधात गुन्हा दाखल करा; भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ

Update: 2021-01-22 06:34 GMT

गेल्या काही दिवसांपासून रेणू शर्मा या महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले होते. मात्र अखेर त्यांची बलात्काराच्या आरोपातून सुटका झाली आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या गायिकेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. तिने केलेल्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राज्याच्या मंत्र्यानेच महिलेवर बलात्कार केला म्हणत भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी रेणू शर्मावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात १० तारखेला रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी लगेचच त्याच्यावर खुलासा केला होता. हा खुलासा समोर आल्यानंतरही भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने केलेले आरोप समोर आल्यानंतर भाजपचे नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनिष धुरी तसेच एअर इंडियाच्या पायलटने रेणू शर्मा हिने आपल्याला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

रेणू शर्माचा खरा चेहेरा समोर येऊ लागल्याने तिने लगेचच धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली आहे. भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील तक्रारमागे घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. "धनंजय मुंडे यांच्यावर जेव्हा बलात्काराचा आरोप झाला ही धक्कादायक बाब होती. पण आज बलात्काराची तक्रार मागे घेतली हे सुद्धा तितकेच धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आज रेणू शर्माने आरोप मागे घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे." मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.

Full View
Tags:    

Similar News