राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या कि त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होतो. पेट्रोल वाढले कि महागाईचा सुद्धा भडका होणार हे निश्चित असते. त्यामुळे पेट्रोलचे दर हा फक्त ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांचाच विषय आहे असं नाही. अगदी सर्वसामान्य लोकांना सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत चिंता असते. आता जर विचार केला तर मागच्या काही वर्षात पेट्रोल व डिझेलच्या किमती कुठे जाऊन पोहोचल्या आहेत हे आम्ही सांगायला नको. मागच्या काही वर्षांपूर्वी पेट्रोल १०० पार करेल असं कोणाला तरी वाटलं होतं का? अगदी मनापासून उत्तर द्या... जाऊदे पण आज पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत माहित आहे का? पाहुयात आजचे पेट्रोल व डिझेलचे दर पुढच्या ३० सेकंदात... तर मुंबईत आज पेट्रोल 106 रुपये तर डिझेल 94.27 रुपये लिटर मिळत आहे. पुण्यात पेट्रोल 106.17 तर डिझेल 92.68 रुपये लिटर, पालघरमध्ये पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.09 रुपये लिटर आहे. रायगडमध्ये पेट्रोल 105.89 तर डिझेल 92.39 रुपये लिटर, रत्नागिरीमध्ये पेट्रोल 107.43 तर डिझेल 93.87रुपये लिटर मिळत आहे.