करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला, पुढील सुनावणी 18 सप्टेंबरला

Update: 2021-09-14 08:10 GMT

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या करूणा शर्मा काही दिवसांपासून न्यायालयीन कोठ़डीत आहेत. त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात आज अंबाजोगाई येथे न्यायालयात सुनावणी पार पडली.

न्यायालयाने करुणा शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तपास अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याने आजचा जामीन अर्ज फेटाळला. तसंच या केस संदर्भात पुढील सुनावणी 18 सप्टेंबरला पार पडणार आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर आज (14) तारीख देण्यात आली होती. मात्र, ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे. त्या न्यायाधीश रजेवर असल्याने इतर न्यायालयासमोर आज सुनावणी पार पडली.

करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणीसाठी आज दिनांक 14 तारीख देण्यात आली होती. मात्र, ज्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सापत्नीकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहेत. त्या न्यायाधीश आज रजेवर आहेत. त्यामुळे आज दुसऱ्या न्यायालयात या जामीनावर सुनावणी पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार न्यायमुर्ती सापत्नीकर 16 सप्टेंबर पर्यंत रजेवर आहेत.

Tags:    

Similar News