आज वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्नीकडून खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांना जिलेबीची उपमा दिली आहे. त्यांनी म्हंटल आहे कि, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2022
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !#Devendra_Fadnavis pic.twitter.com/bHtz03Eo9Q
आज राज्याचे आजी व माजी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. अगदी काल रात्रीपासूनच समाजमाध्यमानवर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर शुभेच्यांचा वर्षाव सुरु आहे. दोघांना अनेक प्रकारे लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्या समाजमाध्यमांवर आलेल्या शुभेच्छांमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती अमृता फडणवीस यांनी आपल्या पतीला दिलेल्या शुभेच्छांची. त्यांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस याना जिलेबीची उपमा देत त्यांना जिलेबी खाऊ घालत असलेला फोटो शेअर केला आहे. त्यांनी नवऱ्याला दिलेल्या या हटके शुभेच्छांची सोशल मीडियावर आता जोरात चर्चा सुरु आहे.