कोरोनाचा आरोग्य कर्मचाऱ्यांवर मानसिक परिणाम - ICMR

- आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या निर्माण झाल्या असल्याचे ICMR च्या अहवालात म्हटले आहे.

Update: 2021-09-17 14:14 GMT

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. सध्या भारतात कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी होत असले तरी धोका अद्यापही टळलेला नाही. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीयंट समोर आले आहेत. यामध्ये अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली. तर अनेक लोकांनी आपला प्राण देखील गमावला. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अनेक प्रयत्न केले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करून कोरोना रुग्णांची सेवा केली. या सगळ्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMC च्या अहवालातून समोर आले आहे.

कोरोना महामारीमूळ अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळ, काळ आणि आरोग्याचे भान न ठेवता काम करावे लागले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या निर्माण झाल्या असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल सादर करण्यापूर्वी 967 पेक्षाही जास्त लोकांवरती अभ्यास केला गेला आहे. यामध्ये 54 टक्के महिला आणि 46 टक्के पुरुष होते. या अभ्यासामध्ये जे सहभागी झाले होते त्यांचे वय हे प्रामुख्याने 20 ते 40 या वयोगटातील होते. ICMR ने कोरोणामुळे झालेल्या या बदलांकडे त्याच बरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आव्हानाकडे लक्ष दिले आहे.

Tags:    

Similar News