अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद हद्दीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून पुन्हा सात दिवस 'लॉकडाऊन'चा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद असणार आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कठोर निर्णय घ्यावे लागेल असा इशारा गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार आता सरकारने पावलं उचलण्यास सुरवात केली आहे.
तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांसाठी लाॅकडाऊनचे वेगळे आदेश काढले आहेत. ग्राहकांनी जवळची बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करावी. उपहारगृहे, हॉटेलने पार्सल सुविधेसाठी परवानगी राहणार आहे,अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली.
तसेच लग्न समारंभाकरिता वधू व वरपक्षासह २५ व्यक्तींना परवानगी राहील. मालवाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. भाजी मंडई पहाटे ३ ते ६ सुरू राहील,असेही आदेशात म्हंटले आहे.