''चित्रा वाघ यांची भाजपने शेळी केली''
चित्रा वाघ यांची भाजपने शेळी केली आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच पाहायचं वाकून तुमचा सोलापूरचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख बेडरूममध्ये बसलेला आहे. ती महिला त्याचा व्हिडिओ काढत आहे, ती ओरडत आहे माझ्यावर अन्याय झाला, हे सगळं होत असताना चित्रा वाघ तुम्ही एकही ट्विट केलं नाही असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सध्या समजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका हॉटेलमध्ये नाना पाटोले व एक महिला दिसत आहेत ती महिला पाटोले यांच्या खांद्यावर डोके ठेऊन बसली आहे असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी ट्विटर वर शेअर करत ''काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं'' असा प्रश्न केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर हा व्हिडीओ एडिट केला असून हे भाजपचे कारस्थान असल्याचं नाना पाटोले यांनी म्हंटल आहे. आता चित्र वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी चित्र वाघ यांची भाजपने शेळी केली असल्याचं म्हणत वाघ यांच्यावर घणाघात केला आहे.
संगीत तिवारी यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हंटल आहे की, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच पाहायचं वाकून तुमचा सोलापूरचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख बेडरूममध्ये बसलेला आहे. ती महिला त्याचा व्हिडिओ काढत आहे, ती ओरडत आहे माझ्यावर अन्याय झाला, हे सगळं होत असताना चित्रा वाघ तुम्ही एकही ट्विट केलं नाही. या प्रकरणावर तुम्ही काही बोलला नाही. ती पण मुलगी न्याय मागत आहे. संजय राठोडला तुम्ही इतकं पिडलात तो आता तुमच्याकडे आल्यानंतर तो आता पवित्र झाला? तुम्ही आता संजय राठोड यांना राखीपोर्णीमेला राखी बांधणार. आहो चित्र ताई बास करा.. आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट? आता तुम्ही एकदम खुश होऊन पत्रकार परिषद घेत आहेत पण तुमच्या पक्षातील लोकांनी काय केलं आहे ते देखील पहा असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच फटकारले आहे.
अपराध सगळ्यांसाठी एक आहे. त्यासाठी पक्षपात करू नका. हा तुमचा पक्षपातीपणा लोकांच्या लक्ष्यात येतो आहे. महिलांसाठी तुमचा कळवळा आहे ना तो सगळ्यांसाठी असला पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी केलेली पापं झाकायची? तुम्ही ते देखील समोर घेऊन या. दुसऱ्याच्या बाबतीत बोलण्या आधी सत्यता काय आहे याची तपासणी करून घ्या. नाना पाटोले यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. भाजपच्या सोशलमिडीयाचे हे कामाचं आहे आणि याचे त्यांना पैसे देखील मिळतात असं देखल तिवारी यांनी म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
नाना पाटोले यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ मध्ये एका हॉटेलमध्ये नाना पाटोले व एक महिला दिसत आहेत ती महिला पाटोले यांच्या खांद्यावर डोके ठेऊन बसली आहे आहे असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी ट्विटर वर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांच्यावर एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावने कितपत येग्य आहे? असं म्हणत अनेकांनी टीका देखील केली आहे.
या सर्व प्रकारानंतर चित्र वाघ यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पटोले यांचा हा व्हिडीओ फारच धक्कादायक असल्याचं म्हंटल आहे. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी केल्यानंतर त्यांनी जेव्हा एखादी खाजगी गोष्ट पब्लिक मध्ये येते तेव्हा ती खाजगी राहत नाही. जी गोष्ट जोपर्यंत बाहेर येतं नाही तोपर्यंत ती खासगी असते. पटोले यांचा व्हिडीओ आज सकाळपासून व्हायरल होत आहे तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला असल्याचं वाघ यांनी म्हंटल आहे..