''भाजपवाले माफीवीर म्हणून प्रसिद्ध आहेतच म्हणून…'' संगीता तिवारींची भाजपवर टीका
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे. तर वादग्रस्त वक्तव्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवरून भारताने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. या भुमिकेवर भाजपच्या नेत्या संगीत तिवारी यांनी, भाजपकडून चूक करायची आणि त्याची माफी भारताने मागायची हे अजिबात चालू देणार नाही. भाजपला लाज वाटत नाही का? असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
यापुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धर्माधर्मात आग लावून निवडणूक जिंकणं ही भाजपची रणनीती आहे. मागील आठ वर्षांपासून भाजप फक्त हिंदुत्ववादी विचारांनीच सरकार चालवत आहे. या सरकारकडे फक्त मंदिर आणि मज्जित इतकेच विषय आहेत. विकासांच्या विषयांवर कुठेही बोलले जात नाही. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेले वक्तव्य हे समाजात आतंक निर्माण करण्यासाठी केलं गेलं आहे. असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली आहे..
भाजपवाले माफीवीर म्हणून प्रसिद्ध आहेतच म्हणून हे आता देशाला माफी मागायला लावणार का? प्रत्येक धर्मात संत असतात आणि त्यांचा आदर करणं हे भारतीय लोक जाणतात. कुठल्याही पक्षाला संतांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. नुपुर शर्मा सारख्या वाचाळवीरांमुळे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर माफी मागावी मागावी लागते ही खूप शरमेची गोष्ट आहे. आज भाजपाने भारताची मान झुकवले आहे. भाजप ही खेळी का करत आहे? तर भाजप हे हिंदू-मुस्लीम यांच्यामधील वाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने सर्वांसमोर भारताला गुडघ्यावर आणून काय साध्य केलं? असा प्रश्न करत त्यांनी भाजपवर सडकून हल्लाबोल केला आहे.