"काकांनी केलेले एक विधायक काम सांगा?", ताईंच्या वनलायनरला कमेंट्सचा पाऊस

ताईंनी शरद पवारांचं एक काम विचारलं, नेटकऱ्यांनी कामांचा पाऊस पाडला.

Update: 2022-04-09 15:22 GMT

शरद पवार हे देशाच्या राजकारणातले सध्याच्या घडीचे महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. या ना त्या कारणाने तीचा प्रत्येक वेळी उहापोह केला जातो. ते असे नेते आहेत ज्यांच्यावर अबालवृध्द प्रेमही करतात आणि टीकाही करतात. शरद पवारांची मुलाखत घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंमतीत एकेकाळी देशात काहीही झालं तरी पवारांमुळेच झालं अशी परिस्थिती होती असं म्हणाले होते. समाजमाध्यमांमध्ये अनेक जण त्यांच्यावर टीकाही करतात आणि त्यांच्या कामांचं कौतुकही करतात. असाच काहीसा प्रकार ट्विटरवर घडल्याचं पाहायला मिळतंय.

वृंदा नावाच्या एका ट्विटर वापरकर्तीने, "काकांनी केलेलं एक विधायक काम सांगा?", असं ट्विट केलं. मग काय त्यांच्या या वनलायनरवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांनी तर त्यांना शरद पवारांनी महिलांसाठी केलेली कामं मोजून दाखवली.

यावर दिनेश जैन या ट्विटर वापरकर्त्याने त्यांना प्रतिक्रीया देताना म्हटलं आहे की, "नेमकं काका कोणतं म्हणायचं तुम्हास्नी जरा ईस्कटून सांगा लय घोळ व्हयला आमचा", असं म्हणंत त्यांच्याच जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉट अपलोड केला आहे. ज्यात वृंदा यांनी "पुण्याचा विकास राष्ट्रवादीशिवाय शक्य नाही", असं ट्विट केलं होतं.

विश्वात्मक पाटील कुहिले या आणखी एका वापरकर्त्याने ट्विट करत, "अहो ताई...

पवार साहेबांना दगडाने मारण्याचा तुम्हाला नक्कीच अधिकार आहे कारण महिलांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय त्यासाठीच घेतला होता..!!", असं म्हणत महिलांसाठी पवारांनी केलेल्या कामांची आठवण करून दिली आहे.

दिनेश जैन यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रीया देत, "एका मुलीवर थांबन हे त्यावेळेस जनतेला सांगण मुलगा मुलगी भेद करू नका असा संदेश तळागाळात पोहचवणे कमी नाही

भोसरी MIDC आज इतकी मोठी आहे त्याचे श्रेय्य त्यांचेच म्हणून भोसरीत लोकसंख्या वाढली

हिंजवडी IT पार्क चाकण MIDC रांजणगाव MIDC पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केलंय", पवारांच्या इतर कामांची आठवण करून दिली आहे.

तर आशिष माळी यांनी देखील कमेंट करत किल्लारी भुकंपावेळी पवारांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाची आठवण करून दिली आहे. "लातूरच्या किल्लारी भूकंपावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाला तोड नाही, 3 महिने तळ ठोकून होते. त्यामुळेच भूज भूकंपात तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीवरून शरद पवार हे केंद्राच्या आपत्कालीन मदत व्यवस्थेचे प्रमुख होते.",

Tags:    

Similar News