भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी शहरातील साई मंदिरात मंदिर स्वच्छता अभियान राबवलं आहे. हातात झाडू आणि सुपली घेऊन त्यांनी मंदिराची स्वच्छता करत साईबाबांची आरती देखील केली आहे. आज देशभरात नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रभू श्रीरामाचा नारा दिला जात असून संपूर्ण जग श्रीराममय झालं आहे.. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे मीडियाशी बोलताना म्हणाल्या, की जर ते प्रभू श्रीराम असून त्यांना देखील वनवास चुकला नसेल, तर मी सामान्य माणूस आहे...अस म्हणत पंकजा मुंडे यांनी संघर्षावर केलं भाष्य..
मराठा आरक्षणावर त्या म्हणल्या की माझी मराठा आरक्षणावरची भुमिका 20 वर्षापूर्वी होती तीच आहे. तर यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांकडून अपेक्षा व्यक्त करत म्हणाल्या, की रॅलीमुळे इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्रास होऊ नये, अशी अपेक्षा यावेळी मुंडेंनी केलीय.