"पोलीस दलाची अवस्था, आंधळं दळतंय..."; बीडच्या घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या
बीड जिल्ह्यातील दिंद्रूड गावातील शेतात काम करणाऱ्या एका महिलेकडे काही विकृतांना शरीरसुखाची मागणी, आणि विरोध केला म्हणून या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे पिडीतीला न्याय सोडा पुन्हा तिच्याच कुटुंबातील ३५४,३२४ सारखे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
याचवेळी त्यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारवर सुद्धा टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, बीड सारख्या अनेक घटना रोज घडतायत, महाराष्ट्र हा पहिला असा राज्य असेल जिथल्या राज्यकर्त्यांवरती राज्यातील महिलांनी बलात्काराचे आरोप केली असतील. आणि हेच आदर्श घेऊन दिवसेंदिवस अशा विकृती वाढत चालली असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.