पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता... ।maharashtra rain update
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरीही अद्याप म्हणावा तसा पाऊस महाराष्ट्रात पडल्याचं पाहायला मिळत नाही आहे. पावसाला सुरुवात झाली पण मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर अत्यंत कमी झाला होता. पण आता आयएमडीच्या वृत्तानुसार येणारे दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस. होसाळीकर यांनी याबाबत एक ट्विट केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटल आहे की, ५ आणि ६ जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सहा जून पर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पर्जन्याचा अंदाज आहे..
4Jul:IMD GFS indicate;likly of hevy-very hevy RF ovr westcoast on 5,6Jul,with RF intensity moving to N Konkan on 6th. Int of Mah me RF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2023
IMD GFS नुसार 5,6 जुलै,पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.6 ला तीव्रता उत्तर कोकणात सरकणार.राज्याच्या अातल्या भागात मध्यम पाऊस pic.twitter.com/6hEncy81LF