दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
दोन सत्रांमध्ये कामकाज
आज सकाळी दहा वाजता राज्यसभेचे कामकाज होणार आहे तर सायंकाळी चार वाजता लोकसभेचे कामकाज होणार आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे केंद्र सरकारच्या वतीने दोन सत्रांमध्ये संसदेचे कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेगासस वर गदारोळ होण्याची शक्यता
आज संसदेमध्ये पेगासेसच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला विकासाच्या मुद्द्यावर तात्काळ चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या डीएच्या थकबाकीबाबत आज निर्णय घेतला जाऊ शकतो.
कॅबिनेट बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी 3.15 वाजता पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.