भाजपच्या महिला नेत्याला PSI भरती घोटाळ्यात अटक; पुण्यात बसल्या होत्या लपून..

कर्नाटक सीआयडीने पुण्यात येऊन एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या एका महिला नेत्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.;

Update: 2022-04-29 07:29 GMT

 कर्नाटक सीआयडीने पुण्यात येऊन एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या एका महिला नेत्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

भरती घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या भाजपच्या या महिला नेत्याचं नाव दिव्या हागारगीला असे आहे. त्या काही दिवसांपासून पुण्यात लपुन बसल्या होत्या. पोलिसांना याची माहिती मिळताच आज सकाळ त्यांना पकडण्यात आले आहे. आता त्यांना कलबुर्गी येथे नेले जाण्याची शक्यता आहे. हे जे भरती घोटाळा प्रकरण आहे या प्रकरणात अटक झालेल्या दिव्य ह्या 18 व्या आरोपी आहेत. त्यांचे पती राजेश हागारगीला यांनासुद्धा या प्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पतीला अटक झाल्यानंतर दिव्या यांनी कर्नाटकातून पळ काढला होता. त्यानंतर त्या पुण्यात येऊन लपून बसल्या होत्या. त्यानंतर कलबुर्गी इथल्या कनिष्ठ न्यायालयाने भाजपच्या नेत्या दिव्या यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.




 कोण आहेत या भाजपच्या दिव्या हागारगीला..

दिव्या हागारगीला या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपच्या महिला युनिटच्या अध्यक्ष होत्या. भरती घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी करून पक्षाचा यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. दिव्या यांचे या प्रकरणात नाव कसे पुढे आले? तर भरती परीक्षा झाली आणि त्यानंतर एका उमेदवाराने 21 प्रश्न सोडवले होते. त्याने फक्त एकवीस प्रश्न सोडवले होते मात्र त्याला त्या भरती परीक्षेत 121 गुण मिळाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीआयडीच्या चौकशीत त्यांचं नाव समोर आलं होतं. त्या विद्यार्थ्याचा ज्ञान ज्योती संस्था या परीक्षा केंद्रावर नंबर आला होता आणि ही संस्था शैक्षणिक संस्था दिव्या या चालवतात. त्यानंतर सीआयडीने केलेल्या तपासातून प्रत्येक उमेदवाराकडून 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा तसेच पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

Tags:    

Similar News