महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामीत्व?, भाजप आमदारांचा रूपाली चाकणकर यांना सवाल...

Update: 2022-06-14 13:40 GMT

 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला जे भाषण केलं आणि त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला आहे.

रूपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात त्या कधीच वडाची पुजा करत नाहीत असं म्हटलं होतं शिवाय त्यांनी सत्यवानाची सावित्री महिलांना जास्त लवकर समजली आणि शेणामातीचे गोळे अंगावर झेलणारी जोतिबाची सावित्री अजुनही कळाली नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता अनेकांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे.

भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामित्व असं म्हणत रूपाली चाकणकर यांना सवाल विचारला आहे. "वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं @ChakankarSpeaks. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे. तुम्ही करत नाही. पण व्रत न करण्याचा गवगवा करून व्रत करणाऱ्या इतर महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामीत्व आहे?

यात निसर्गाशी जोडले जाण्याचा उद्देश आहे, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरण्याचे कारण काय असावे? पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाला खुला विरोध हा आपला जुनाच अजेंडा राहिलेला आहे. तो सुरूच ठेवा.. आमच्या धर्म, संस्कृतीचे त्यामुळे काहीच बिघडणार नाही" असं मेघना बोर्डीकर म्हणाल्या आहेत.

Tags:    

Similar News