''निराश होऊ नका'' पराभवानंतर प्रियंका गांधी यांचे ट्विट

Update: 2022-03-10 15:02 GMT

आज अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती अशा देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर आला. या पाचही राज्याचा निकाल हाती आल्यानंतर पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पण या चारही राज्यांमध्ये काँग्रेसचा मात्र पूर्ण सुपडा झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसला एकाही राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश आलेलं दिसत नाही. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश मध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार कंबर कसली होती. मात्र उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसचा पुरा सुपडा झाल्याचं दिसत आहे.

या पराभवानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका असं सांगितल आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये आपली लढाई आता सुरू झाली आहे आणि हा आपण संदेश दिला आहे. राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतानाही तुम्ही ज्याप्रमाणे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटिबद्ध राहिलात याचा मला खूप अभिमान आहे" असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हंटल आहे.

त्याचबरोबर त्यांनी या सोबत एक पत्र देखील आपल्या कार्यकर्त्यांसाठी जाहीर केला आहे यामध्ये देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचं दिसत आहे.




 


Tags:    

Similar News