अनिल देशमूख यांना क्लिन चीट नाही: अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील

Update: 2021-08-29 13:41 GMT
अनिल देशमूख यांना क्लिन चीट नाही: अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील
  • whatsapp icon

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने क्लीन चीट दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. मुंबई चे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत.

दरम्यान ज्या अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळं अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्या जयश्री पाटील यांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना 'मी या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलले असून सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली नसल्याचं म्हटलं आहे. अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा संपूर्ण तपास CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले होते,

अनिल देशमुख त्यावेळेस गृहमंत्री असल्यामुळं पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याबाबत उच्च न्यायालयाने देखील शंका उपस्थित केली होती. पाहा काय म्हटलंय जयश्री पाटील यांनी

Full View
Tags:    

Similar News