अमृता फडणवीस म्हणतात... सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है

सोशल मीडियावर सतत आपल्या भूमिकेने चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस आपले विचार, मत अगदी स्पष्ट आणि निडरतेने ट्विटर, फेसबुकच्या माध्यमांतून मांडत असतात. महाराष्ट्राच्या इतिहासात माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांनी आपली वेगळीच छाप निर्माण केली आहे.;

Update: 2021-04-10 12:36 GMT

सोशल मीडियावर सतत आपल्या भूमिकेने चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस आपले विचार, मत अगदी स्पष्ट आणि निडरतेने ट्विटर, फेसबुकच्या माध्यमांतून मांडत असतात. महाराष्ट्राच्या इतिहासात माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांनी आपली वेगळीच छाप निर्माण केली आहे.

अमृता आपल्या वेगवेगळ्या ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. तसेच आज त्यांनी नेटिझन्सला वेगळा चर्चेचा मुद्दा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरून एक ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी ट्विटसोबत त्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. या फोटोला अमृता यांनी 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है', असं कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.

अमृता फडणवीस यांचा 9 एप्रिल ला वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील चेहऱ्याला केक लावलेला फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर आणि फेसबूक या दोन्ही अकाउंटवर शेअर करत भन्नाट असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags:    

Similar News