"आपला मेहुणा अब्जाधीश आहे हा मला सुध्दा धक्का होता", अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्मावर बोट

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी टीका केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ही त्यांना ट्विटरवर प्रतिउत्तर देत टीका केली आहे.;

Update: 2022-05-02 08:59 GMT

 दिवसेंदिवस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचं अमृता फडणवीस यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. आतापर्यंत उध्दव ठाकरेंनी त्यांच्या या टीकांवर दुर्लक्ष केलं होतं परंतू १ मे ला महाराष्ट्र दिनी दैनिक लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नाव न घेता अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला अमृता फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.


१ मे ला महाराष्ट्र दिनी दैनिक लोकसत्तेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, "राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे देखील चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला धक्का होता. मला वाटलं वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, इतरही गातात.", असा टोला त्यांनी या मुलाखतीत अमृता फडणवीस यांना नाव न घेता लगावला. त्यांनी टीका करण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी ट्विटरवरूनच त्यांनी उध्दव ठाकरेंना ठरकी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बातम्या झाल्या. अशाच एका बातमीचा आधार घेऊन अमृता फडणवीस यांनी आता उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांच्या मेहुण्यांचा उल्लेख करत टीका केली.

नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस यांनी टीका करताना म्हटलंय, "मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे ! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात !!" त्यांनी या ट्विटमधून थेट मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचं नाव घेऊन टीका करत त्यांच्यावर इडीने केलेल्या कारवाईचं प्रकरण पुन्हा उकरून काढलं आहे.


नेटकरी काय म्हणतायत?

नम्रता शांभरकर या वापरकर्तीने अमृता फडणवीस यांचा देवेंद्र फडणीस यांना मिठाई भरवतानाचा फोटो पोस्ट करून, "यापेक्षा मोठा धक्का काय असू शकेल प्लास्टिक मामी, या खरंच तुम्हीचं आहात ना?" असं ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे.


त्यानंतर विश्वास कुलकर्णी या वापरकर्त्याने प्रतिक्रीया देताना म्हटलंय की, "अमृताजी एक नंबर रिप्लाय!! ते टोमणे बहाद्दर आहेत. त्यांच्या नका जास्त नादी लागू आपलंच नाव खराब होतं.",


विजय या वापरकर्त्याने, "मला पण धक्काच बसला , आपल्या देशात एकच राणू मंडल थोडी आहे . अजून एक आहे मी पुन्हा येईन वाल्याची ...", अशा शब्दांत ट्विट केरत टीका केली आहे.


दत्ता पाखरे या वापरकर्त्याने तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सुर्याची उपमा देत अमृता फडणवीस यांना प्रश्नच विचारला आहे. "बाई कशाला दुपारी १२च्या वेळी सुर्यावर थुंकण्याच साहस करताय??"


तर पत्रकार दुर्गेश या वापरकर्त्याने उध्दव ठाकरेंचा गळ्याला पट्टा गुंडाळलेला फोटो टाकत, "घरी रश्मी वहिनींना पण असेच टोमणे मारायचा परिणाम" अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Tags:    

Similar News