केतकी चितळेची पोस्ट नक्की तिनेच लिहिली आहे का? नाही मग कुणी लिहीली जाणून घ्या..

Update: 2022-05-14 04:36 GMT

अभिनेत्री केतकी चितळे ही कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असते. गेल्या काही काळापासून ती शांत होती परंतू शुक्रवारी पुन्हा एकदा तिने एक वादग्रस्त पोस्ट केलीये. या वेळी तिने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणारी काव्यरचना पोस्ट केलीये. ही काव्यरचना तिने लिहीलेली नसुन कुणी ऍड. नितिन भावे आहेत त्यांनी लिहीली आहे.


नेमकी हा काव्यरचना काय आहे हे आपण पाहूयात,

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

काव्य रचना करणाऱ्या नितिन भावे यांनी यात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांप्रमाणे त्यांचंच नाव घेऊन सुरूवात केलीये. शब्दशः सार काढायला गेलो तर हा निघतो की, तुकाराम महाराज पावारांना सांगतात की तोंडाचा फवारा उडवू नको, आता या काव्य रचनेतील पवार कोण हे आपल्याला पुढील वर्णनावरून स्पष्ट होतं. तुर्तास पुढील ओळींचा अर्थ पाहुयात. वयाची ऐंशी ओलांडली आहे आता खुप जगलात नरक आपली वाट पाहत आहे. सारे शिलेदार पडले आता फक्त सुप्रिया सुळे आणि सतरा वेळा तोंडातून लाळ गळत असते.

Full View

शरद पवारांचा समर्थ रामदास स्वामींना असलेला विरोध जगजाहीर आहे त्यावरून बोलत समर्थ रासदास स्वामी हे शरद पवारांच्या बापाचेही बाप आहेत असं म्हटलं आहे. शरद पवार हे ब्राम्हणांचा मत्सर करतात म्हणुन त्यांची तुलना डासाशी केली गेली आहे. शरद पवार आपल्या पापांचा घडा भरला आहे गप्प बसा नाही तर राडा होईल असा धमकीवजा इशाराच देण्यात आला आहे. फुकटचा पैसा खाऊन पवारांचं तोंड हे वाकडं झालं असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे लबाडांचे लबाड असल्याचं या अभंग रचनेत म्हटलं आहे.

हा वादग्रस्त अभंग पोस्ट करून अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेच पण तिच्यावर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चौफेर टीका करत आहेत. या सगळ्या टीका टिप्पणीला केतकी कशी सामोरी जाते आणि शरद पवार यावर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News