राज्यातील मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यातून आपल्या कामांना सुरुवात केली आहे.
सुधागड तालुक्यातील पाली येथील बेघरआळी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच इमारतीची पहाणी केली आहे.
यावेळी "माझी कन्या भाग्यश्री" योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अदिती तटकरे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.तसेच यावेळी गरोदर मातेचे ओटीभरन व सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला अन्नप्राशन महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील महिलांसाठी असणाऱ्या अधिकाधिक योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असून शक्य तितका न्याय देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे आश्वासन महाराष्ट्राच्या नवनियुक्त महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.